ताजे अपडेट

सिन्नर येथे सहकार सप्ताह निमित्ताने सहकारी संस्था आणि पतसंस्थांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन; विविध तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन

सिन्नर येथे सहकार सप्ताह निमित्ताने सहकारी संस्था आणि पतसंस्थांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन; विविध तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन

सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, दि. ०५ जुलै २०२६. www.nipakshsatyaguru.in

सहकारी संस्था आणि पतसंस्थांच्या कामकाजात अधिक सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने सोमवार दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी एक विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहकारी क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञ मार्गदर्शक विविध विषयांवर प्रकाश टाकणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. संजयजी गीते साहेब

भव्य उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती

कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, सिन्नर) मा. श्री. संजयजी गिते साहेब यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहकार भारती नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष मा. श्री. नारायणशेठ वाजे, दैनिक महासागरचे संपादक मा. श्री. जयंतजी महाजन सर, सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. संग्रामजी कातकाडे व उपाध्यक्ष मा. श्री. अरुणशेट वारुंगसे, सहकार भारती सिन्नर तालुक्याचे अध्यक्ष मा. श्री. भास्कर पवार सर आणि सिन्नरचे तालुका लेखापरीक्षक मा. श्री. दिपकजी सावंत, मा. श्री. सुदर्शन तांदळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विविध सत्रांमधील मार्गदर्शनाचे विषय:

उद्घाटनानंतरचे पहिले सत्र (सकाळी ११:०० ते ११:३०) मा. श्री. संजयजी गिते (सहाय्यक निबंधक, सिन्नर) हे उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन करतील.

आयकर कायद्यातील बदल (सकाळी ११:३० ते दुपारी १२:३०) मा. श्री. अरुणजी डावरे (सनदी लेखापाल, नाशिक) हे ‘आयकर कायद्यामध्ये होणारे बदल व त्यामुळे पतसंस्थांवर होणारे परिणाम’ या विषयावर सविस्तर माहिती देतील.

लेखापरीक्षण पूर्व तयारी (दुपारी १२:३० ते दुपारी १:३०) मा. श्री. दिपकजी सावंत साहेब (तालुका लेखापरीक्षक, सिन्नर) हे ‘लेखापरीक्षण पूर्व करावयाची कामे व घ्यावयाची काळजी’ याविषयी मार्गदर्शन करतील.

कामकाजातील बदल व आदर्श उपविधी (दुपारी २:३० ते ३:३०) म.रा.रा. सह.संघ, पुणे चे मुख्य कार्य.अधिकारी मा. श्री. हरीभाऊ वाकचौरे हे ‘आदर्श उपविधी व त्यामुळे होणारे कामकाजात बदल’ या विषयावर प्रकाश टाकतील.

आरोग्य विषयक मार्गदर्शन (दुपारी ३:३० ते सायंकाळी ४:००) मा. डॉ. प्रशांत गाढे (बी.एच.एम.एस.) हे ‘सर्पदंश व हार्ट अटॅक यावर प्राथमिक उपचारासंबंधी मार्गदर्शन’ करणार आहेत.

कार्यक्रमाची सांगता

कार्यशाळेच्या शेवटी सायंकाळी ४:०० ते ४:३० या वेळेत उपस्थितांसाठी एक ‘प्रश्नमंजुषा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रतिनिधींना आपल्या शंकांचे निरसन करता येईल.

या कार्यशाळेची सुरुवात सकाळी ९:३० वाजता नाव नोंदणी, नाष्टा व चहापानाने होणार असून, दुपारी १:३० ते २:३० या वेळेत ‘सुरूची भोजन’ होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचा लाभ सिन्नर तालुक्यातील सर्व सहकारी संस्था व पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका