सकारात्मक व वस्तुनिष्ठ पत्रकारितेची गरज अधिक – प्रा. जयंत महाजन

- सकारात्मक व वस्तुनिष्ठ पत्रकारितेची गरज अधिक – प्रा. जयंत महाजन
साप्ताहिक ‘निःपक्ष सत्यगुरु’चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
निःपक्ष सत्यगुरु | सिन्नर, दि. २२ जानेवारी २०२६, www.nipakshsatyaguru.in
डिजिटल युगात पत्रकारितेचा वेग वाढला असला, तरीही गांभीर्य, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक जबाबदारी जपणारी पत्रकारिता ही काळाची गरज आहे. केवळ भडकपणा करून पत्रकारिता टिकत नाही, तर भावी पिढीला योग्य दिशा देणारी सकारात्मक पत्रकारिता होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रा. जयंत महाजन यांनी केले.

साप्ताहिक निःपक्ष सत्यगुरु या वृत्तपत्राच्या प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहाय्यक निबंधक संजयजी गीते यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून सिन्नर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष हर्षद देशमुख उपस्थित होते.
यावेळी निःपक्ष सत्यगुरुचे संचालक व कार्यकारी संपादक संजय देशपांडे, मुख्य संपादक कांताराम माळी, पत्रकार महेश कुटे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू , तसेच नवनिर्वाचित नगरसेवक अनिल भाऊ सर्वात यावेळी उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. जयंत महाजन पुढे म्हणाले की, सध्याचा काळ डिजिटल मीडियाचा असला तरीही दर्जेदार साप्ताहिकाचे महत्त्व आजही कायम आहे. स्थानिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थी यांच्या अपेक्षा व महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. त्या सर्वांवर सखोल अभ्यास करून लेखन करणे आवश्यक आहे. निःपक्ष सत्यगुरुसारखे साप्ताहिक हे समाजातील वास्तव प्रश्न मांडण्याचे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी युवा नेते उदयभाऊ सांगळे यांनी आपल्या भाषणात पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करत, “अनुभवी, अभ्यासू व दूरदृष्टी असलेले प्रा. जयंत महाजन यांच्यासारखे संपादक म्हणजे पत्रकारितेतील चालता-बोलता विद्यापीठच आहे. त्यांच्या अनुभवाचा खजिना भावी पिढीसाठी मोलाचा ठरेल,” असे गौरवोद्गार काढले.

सिन्नर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष हर्षद देशमुख यांनी निःपक्ष सत्यगुरु साप्ताहिकाचे कौतुक करत, “हे साप्ताहिक समाजातील सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरेल. भावी पिढीसाठी या माध्यमातून निश्चितच चांगले दिवस येतील,” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक निबंधक संजयजी गिते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, “निःपक्ष सत्यगुरु साप्ताहिक हे समाजप्रबोधनाचे काम करेल. या माध्यमातून भावी पिढीसाठी मोलाचे मार्गदर्शन मिळेल, यात कोणतीही शंका नाही,” असे ठाम मत मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निःपक्ष सत्यगुरु साप्ताहिकाचे मुख्य संपादक कांताराम माळी यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार महेश कुटे यांनी प्रभावीपणे पार पाडले. शेवटी कार्यकारी संपादक संजय देशपांडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
तसेच यावेळी सर्वश्री सन्माननीय बी. एम. पवार, अतुल कासट, नामदेव जाधव, डॉ. प्रशांत गाडे, डॉ. राजेंद्र कमानकर, संजय सोनवणे, अविनाश कांडेकर, कैलास मस्के, नितीन खरनार, राजेश कपूर, संदीप घोडे, नामदेव जाधव, राजाराम उगले, राम लोणारे, प्रवीण हांडोरे, सुदर्शन तांदळे, नवनाथ गडाख, किरण गायकवाड, कापडणीस, दिनेश खेडलेकर, राहुल शिंदे, सविता कमानकर, सीमा महाजन, शितल माळी, संतोष ढमाले, सुयोग कानडे, निवृत्ती भागवत, मधुकर सदगीर, अस्लम पिंजारी, मधुकर खरात, विकी गुजर, अनिकेत मूत्रक, सजन सांगळे, संकेत माळी, अनिकेत कलंत्री, नारायण पवार, विलास पवार, आणि विद्यार्थी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

