डॉ. श्यामसुंदर झळके यांचा खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सत्कार
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि २७ ऑगस्ट २०२६
सामाजिक कार्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे सिन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉ. श्यामसुंदर झळके यांना कोपरगाव येथील ‘बी द चेंज फाऊंडेशन’ यांच्या वतीने ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. या उल्लेखनीय सन्मानाबद्दल नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते डॉ. झळके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून डॉ. झळके यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
‘बी द चेंज फाऊंडेशन’ यांच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी साई पालखी निवारा, शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात डॉ. श्यामसुंदर झळके यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. झळके यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सिन्नर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.