शिवजयंतीनिमित्त बुकनुक पब्लिकेशनकडून मोफत डिजिटल बुक

शिवजयंतीनिमित्त बुकनुक पब्लिकेशनकडून मोफत डिजिटल बुक
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी: www.nipakshsatyaguru.in
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी बुकनुक पब्लिकेशनच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व, शासन व राष्ट्रनिर्मितीवर आधारित अभ्यासपूर्ण डिजिटल पुस्तक वाचकांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सदर पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांकडे केवळ इतिहासातील पराक्रमी योद्धा म्हणून न पाहता, त्यांना दूरदृष्टी असलेला व्यवस्थापक, संस्थानिर्माता आणि राष्ट्रघडवणारा नेता म्हणून अभ्यासले आहे. नेतृत्व, प्रशासन, सैनिकी व्यवस्थापन, आर्थिक धोरण, सामाजिक कल्याण आणि कूटनीती या सर्व क्षेत्रांतील महाराजांचे कालातीत विचार व व्यवस्थापन तत्त्वज्ञान या पुस्तकातून सुस्पष्टपणे मांडण्यात आले आहे. हे पुस्तक इतिहासाचे स्मरण न करता, आजच्या काळासाठी मार्गदर्शक ठरणारे विचार मांडते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
बुकनुक पब्लिकेशनच्या या उपक्रमाचा उद्देश शिवजयंती केवळ उत्सव म्हणून न साजरी करता, विचारांची शिवजयंती साजरी करणे हा आहे. विशेषतः विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा अभ्यासक, संशोधक, शिक्षक आणि वाचनप्रेमी यांना उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे.
हे डिजिटल पुस्तक मिळविण्यासाठी इच्छुक वाचकांनी Instagram वर BookNook_Publication या अधिकृत अकाऊंटला फॉलो करून ‘EBOOK’ असा संदेश पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर ई-बुक BookNook च्या फॉलोअर्ससाठी मर्यादित कालावधीसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने ज्ञानदानाचा हा उपक्रम अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा बुकनुक पब्लिकेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

