यशाच्या शिखरावर मानाचा तुरा — डॉ. नयन नंदकिशोर निऱ्हाळी यांना आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट

यशाच्या शिखरावर मानाचा तुरा — डॉ. नयन नंदकिशोर निऱ्हाळी यांना आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, प्रतिनिधी, दि. ०२ जून २०२६, www.nipakshsatyaguru.in
सिन्नर शहराच्या शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात अभिमानाची भर घालणारी आनंददायी बातमी समोर आली आहे. येथील सुपुत्र डॉ. नयन नंदकिशोर निऱ्हाळी यांना अमेरिकेतील International American University, California तर्फे “Taxation and Financial Advisory Leadership” या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

करसल्ला (Taxation) आणि वित्तीय मार्गदर्शन (Financial Advisory) या क्षेत्रात त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि जागतिक स्तरावर उंचावलेली कामगिरी याची ही दखल मानली जात आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे त्यांनी या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या गौरवप्राप्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन लोणारे यांनी केले. नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल चव्हाण, तसेच जयप्रकाश गिरासे आणि बिपिन देवरे (पार्क साइड, नाशिक) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान दैनिक महासागरचे संपादक प्रा. जयंत भीमराव महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. नयन निऱ्हाळी यांच्या यशस्वी प्रवासातील विविध प्रसंग प्रभावीपणे मांडले. त्यांनी त्यांच्या चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे कौतुक करत, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असे सांगितले. तसेच त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत “हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद आहे,” असे मत व्यक्त करून त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
कार्यक्रमास नाशिकचे खासदार मा. राजाभाऊ वाजे, तसेच इन्कम टॅक्स व जीएसटी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय सिन्नर व परिसरातील मित्रपरिवार आणि मान्यवरांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
डॉ. निऱ्हाळी यांच्या या यशानंतर त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रीमंती कोकाटे तसेच सिन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. नयन निऱ्हाळी यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सिन्नर शहरासह संपूर्ण परिसराचा गौरव वाढला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. नयन नंदकिशोर निऱ्हाळी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!


