मा. जितेंद्र निगडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय सहनिबंधकपदी बदली; गौतम निकाळजे यांच्याकडे नाशिकचा अतिरिक्त पदभार

मा. जितेंद्र निगडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय सहनिबंधकपदी बदली; गौतम निकाळजे यांच्याकडे नाशिकचा अतिरिक्त पदभार
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि. ३१ जुलै २०२६
सहकार व लेखापरीक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय फेरबदल झाली आहे. नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) मा. श्री. जितेंद्र निगडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे लेखापरीक्षण विभागात विभागीय सहनिबंधक म्हणून पदोन्नतीने/बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, नाशिक येथील विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) या अत्यंत जबाबदारीच्या पदाचा अतिरिक्त पदभार मा. श्री. गौतम निकाळजे यांनी अधिकृतपणे स्वीकारला आहे.
मा. जितेंद्र निगडे यांनी नाशिक विभागातील आपल्या कार्यकाळात लेखापरीक्षण विभागाची कामे वेळेत, पारदर्शक व प्रभावीपणे पूर्ण करण्यावर विशेष भर दिला होता. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल सहकार क्षेत्र, सहनिबंधक कार्यालय व विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
तसेच, नाशिकचा अतिरिक्त पदभार स्वीकारलेले मा. गौतम निकाळजे यांचेही विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे कामकाज अधिक गतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



