ताजे अपडेट

मिशन ग्रीन अँड ब्युटीफुल इंडिया अंतर्गत ३०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

मिशन ग्रीन अँड ब्युटीफुल इंडिया अंतर्गत ३०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, दि. ०६ जून २०२६, www.nipakshsatyaguru.in

 पर्यावरण संवर्धन व हरित भारताच्या उभारणीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र नर्सरी असोसिएशन, लायन्स क्लब इंटरनॅशनल, पपया नर्सरी (नाशिक) आणि लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन ग्रीन अँड ब्युटीफुल इंडिया” अंतर्गत हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज लिमिटेड, सिन्नर येथे ३०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

        या उपक्रमास लायन्स इंटरनॅशनलचे प्रांतपाल ला. राजेश अग्रवाल, निमा अध्यक्ष आशीष नहार, पीएमसीसी ला. गिरीश मालपाणी, उपप्रांतपाल ला. सुनीता मालपाणी, डीसी प्लांटेशन ला. सुरेश साखला, पपया नर्सरीचे संचालक पंकज इसनगर, माजी प्रांतपाल ला. राजेश कोठावदे, अतिरिक्त कॅबिनेट सचिव ला. अपर्णा क्षत्रिय, लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष ला. बबनराव वाजे, तसेच हिंदुस्तान नॅशनल ग्लास अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्ही.पी. ऑपरेशन्स डॉ. रामचंद्र उणे आणि कार्यक्रमाचे आयोजक व निवृत्त संयुक्त आयुक्त (एफडीए, मुंबई) श्री. सत्यनारायण शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

       यावेळी मराठवाडा अॅडव्हर्टायझरचे श्री. रमेश कंडालकर, संपादक श्री. अच्युतराव भोसले, माती व पाणी तज्ज्ञ श्री. बी. डी. भूमकर, बेदमुथा इंडस्ट्रीजचे चेअरमन के. आर. बेदमुथा, व्यवस्थापकीय संचालक विजय के. बेदमुथा, जितो (Apex) चे संचालक नरेंद्र आचलिया व धीरज कांकरिया यांच्यासह लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे खजिनदार प्रशांत शिंदे, डॉ. भरत गारे, हेमंत वाजे, डॉ. विजय लोहारकर, भूषण क्षत्रिय, डॉ. प्रशांत गाढे, संजय सानप, मनीष गुजराथी, सोपान परदेशी, डॉ. सुजाता लोहारकर , स्मिता थोरात , वैशाली सानप,आदी मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमादरम्यान विविध देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. “मिशन ग्रीन अँड ब्युटीफुल इंडिया” या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करून हरित भारत घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करून अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका