ताजे अपडेट

जिद्द आणि कर्तृत्वाची सुवर्णझेप: सिन्नरच्या डॉ. निर्मला पवार यांचे MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश!

जिद्द आणि कर्तृत्वाची सुवर्णझेप: सिन्नरच्या डॉ. निर्मला पवार यांचे MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश!

​सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, प्रतिनिधी : www.nipakshsatyguru.in

कोणत्याही यशाचा मार्ग सोपा नसतो, पण जर मनात जिद्द, प्रामाणिक कष्ट आणि कर्तव्याची जाणीव असेल, तर आभाळही ठेंगणे वाटते. हेच सिन्नरच्या सुकन्या डॉ. निर्मला सुशिल पवार यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात आलेल्या ‘जिल्हा शल्यचिकित्सक’ (Civil Surgeon) व तत्सम पदांच्या अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, त्यांच्या या यशाने संपूर्ण सिन्नर तालुक्याची मान अभिमानाने उंचवली आहे.

​कष्टाला मिळालेली यशाची सुवर्ण किनार

​डॉ. निर्मला पवार यांचे हे यश केवळ एका परीक्षेचे यश नाही, तर त्यांच्या अविरत मेहनतीचे, सातत्याचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे ते गोड फळ आहे. विशेष म्हणजे, यशाची ही शिखरं त्यांनी पहिल्यांदाच पादाक्रांत केलेली नाहीत. यापूर्वीही तीन वर्षांपूर्वी त्यांनी लोकसेवा आयोगाच्या विशेषज्ञ संवर्गातील परीक्षेत आपली दैदिप्यमान गुणवत्ता सिद्ध केली होती. आता सलग दुसऱ्यांदा MPSC ची कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. एकाच तालुक्यातून अशी दुहेरी किमया साधणाऱ्या त्या बहुधा पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.

कर्तव्याचा ताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा सुंदर मेळ

​डॉ. निर्मला पवार यांचे हे यश अधिक भावणारे आणि डोळ्यात कौतुकाचे अश्रू आणणारे आहे, कारण हा प्रवास सोपा नव्हता. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात ‘वैद्यकीय अधीक्षक’ म्हणून अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची भूमिका त्या सांभाळत आहेत. शासकीय कामाचा अहोरात्र असणारा ताण, रुग्णांची सेवा आणि दुसरीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा गोड डोलारा… या सर्वांचा अत्यंत परिपक्वतेने समतोल राखत त्यांनी अभ्यासाचा यज्ञ चालू ठेवला. कर्तव्य बजावतानाच स्वतःच्या स्वप्नांना दिलेली ही आहुती आज यशाच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रासमोर झळकत आहे.

सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव आणि अभिमान

सिन्नरच्या मातीतील एका कर्तबगार महिला अधिकाऱ्याने मिळवलेले हे यश आज अनेकांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी यशाचा नवा दीपस्तंभ ठरेल. शासकीय सेवेचा गौरव वाढवणाऱ्या डॉ. निर्मला पवार यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून, राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​”कर्तव्याची वाट चालताना स्वप्नांना पंख देणाऱ्या डॉ. निर्मला पवार यांच्या पुढील प्रवासाला आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका