डॉ. जी. एल. पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा साध्या व घरगुती वातावरणात संपन्न
डॉ. जी. एल. पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा साध्या व घरगुती वातावरणात संपन्न
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी : दि. १४ फेब्रुवारी २०२६, www.nipakshsatyaguru.in
सिन्नर तालुक्यात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून जनमानसात मानाचे स्थान निर्माण करणारे डॉ. जी. एल. पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा साध्या व घरगुती वातावरणात उत्साहात पार पडला. कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व कौटुंबिक वातावरणात आयोजित करण्यात आला होता.

डॉ. पवार यांनी अनेक वर्षे सिन्नर तालुक्यात वैद्यकीय सेवा देत रुग्णांशी आत्मीयतेचे नाते जपले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे व समर्पित कार्यामुळे त्यांना समाजात विशेष आदर प्राप्त झाला आहे.
त्यांचे सुपुत्र डॉ. सुशील गजीराम पवार हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून समाजसेवा करत आहेत. सून डॉ. निर्मला सुशील पवार (गायकवाड) या शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. पत्नी सौ. लता गजीराम पवार यांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून सन्मानाने सेवानिवृत्ती घेतली आहे.
डॉ. पवार यांना दोन मुली असून दोन्ही मुली उच्चशिक्षित आहेत व सुसंस्कृत कुटुंबात त्यांचे विवाह झालेले आहेत. अभिष्टचिंतन सोहळा घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला. मित्रपरिवार व आप्तेष्टांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत डॉ. पवार यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी साप्ताहिक निःपक्ष सत्यगुरु ग्रुप यांनीही डॉ. जी. एल. पवार यांचे मनस्वी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर श्री. रमेश माळी ( कानडे), नारायण पवार ( धोंडवीरनगर), विलास पवार, आदी मान्यवर यांनी अभिनंदन केले. हा सोहळा त्यांच्या समाजसेवेच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करणारा क्षण ठरला.

