श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी
दि. १८ जुलै २०२६, www.nipakshsatyaguru.in
सिन्नर येथील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरीत्या पार पडले.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. अश्विनी राजनोर मॅडम यांनी सहकार क्षेत्राचे समाजाच्या सर्वांगीण विकासात असलेले महत्त्व अधोरेखित करत, सहकार चळवळीमुळे आर्थिक सबलीकरणाला कशी गती मिळते याचे सविस्तर विवेचन केले.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रा. जयंत महाजन होते. विशेष अतिथी म्हणून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था चे चेअरमन नारायणशेठ वाजे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब देशपांडे तसेच तज्ञ संचालक अॅड. सचिन घोरपडे यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे दिवंगत सभासद, ठेवीदार, देशसेवेसाठी कार्यरत सैनिक व शास्त्रज्ञ तसेच हितचिंतक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर संस्थेचे व्यवस्थापक कांताराम माळी यांनी संस्थेचा ताळेबंद, आर्थिक अहवाल व वर्षभरातील प्रगतीचा आढावा सभासदांसमोर मांडला. संस्थेची आर्थिक प्रगती व पारदर्शक कारभार पाहून सभासदांनी समाधान व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालनही कांताराम माळी यांनीच केले.
सभेच्या शेवटी मनीष गुजराथी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, सभासद व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
उपस्थित मान्यवर:
महेश कुटे, राजेंद्र घोलप, कैलास म्हस्के, डॉ. राजेंद्र कमानकर, नितीन खरनार, प्रवीण हांडोरे, राजेश कपूर, दीपक लोंढे, सुदर्शन जेडगुले, सौ. शिल्पा गुजराथी, रमेश माळी, अॅड. ऋतुराज देशपांडे, मधुकर खरात, विलास पवार, नारायण पवार, सोपान पडवळ, राजेंद्र वेलजाळी, पप्पू माळी, सदाशिव आघाने, संतोष लांडगे, शितल माळी, सुचित्रा तांबे, अनिकेत कलंत्री, अतुल कासट, दिनेश खेडलेकर आदी मान्यवर, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


