शेखर अण्णा चोथवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा;

शेखर अण्णा चोथवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा;
मित्रपरिवार व व्यापारी वर्गाकडून सत्कार
सिन्नर | प्रतिनिधी, दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६,
शेखर अण्णा चोथवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराकडून तसेच व्यापारी वर्गाच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्याची आवड आणि सातत्यपूर्ण योगदानामुळे ओळख असलेल्या चोथवे यांचा वाढदिवस साधेपणात पण आनंदोत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

शेखर अण्णा चोथवे हे माऊली हास्य ग्रुपचे संचालक असून, मजूर फेडरेशन या संस्थेमध्ये त्यांनी डायरेक्टर तसेच चेअरमनपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. संघटन कौशल्य, निर्णयक्षमता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे सिन्नर तालुक्यात त्यांची कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून विशेष ओळख आहे.
नेहमी हसतमुख, मनमिळावू स्वभाव आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध पक्षांमध्ये कार्यरत राहूनही राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला प्राधान्य देत व्यापारी, कामगार व सामान्य नागरिकांसाठी भरीव योगदान दिले आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मित्रपरिवार, व्यापारी वर्ग व हितचिंतकांनी त्यांना अभिष्टचिंतन करत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेतील कार्य अधिक व्यापक व्हावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य कोठूरकर वहिनी, सामाजिक कार्यकर्ते महेश नाईक, राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) सामाजिक कार्यकर्ते राजाराम मुरकुटे, सोपान लोणारे, काँग्रेस पक्षाचे नेते विनायक सांगळे, दिलीप खेडलेकर आदी उपस्थित होते.

