निःपक्ष सत्यगुरु’ डिजिटल मीडियातील वृत्ताचा परिणाम; अष्टविनायक नगरातील गटारप्रश्नी तातडीची कारवाई

‘निःपक्ष सत्यगुरु’ डिजिटल मीडियातील वृत्ताचा परिणाम;
अष्टविनायक नगरातील गटारप्रश्नी तातडीची कारवाई
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी : दि. १७ फेब्रुवारी २०२६, www.nipakshsatyaguru.in
सिन्नर शहरातील अष्टविनायक नगर परिसरातील अपूर्ण गटार चेंबरांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत ‘निःपक्ष सत्यगुरु’ डिजिटल मीडियावर वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेत कारवाई सुरू केली आहे.

( फोटो ओळी : उघड्या असलेला चेंबर मधील अपघात ग्रस्त गाडी)
परिसरातील अनेक चेंबर उघड्या अवस्थेत असून काहींना झाकणे नसल्यामुळे पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः रात्री अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे आणि वाढलेल्या गवतामुळे खड्डे दिसून न आल्याने किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या होत्या. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

(बातमी नंतर काम पूर्ण केलेला फोटो)
सदर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगरसेवक सागर भाटजिरे यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला. त्याचबरोबर नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष बुबुष ( हर्षद ) देशमुख तसेच मुख्याधिकारी अभिजीत कदम यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक निर्णय करून कामास प्राधान्य दिले. तसेच नगरसेवक शेखर गोळेसर, सागर गव्हांदे आदींनी त्यानुसार अपूर्ण चेंबर पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून मजबूत झाकणे बसविणे, गवत साफसफाई आणि प्रकाशव्यवस्था सुधारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांनी प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले असून उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

