ताजे अपडेट

सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती; सिन्नरकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती; सिन्नरकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

 

सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि २१ ऑगस्ट २०२६

 

सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याने सिन्नर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तहसीलदार म्हणून सिन्नर येथे कार्यरत असताना देशमुख यांनी आपल्या कार्यशैलीची वेगळी छाप निर्माण केली. कर्तव्यनिष्ठा, विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि कोणतेही काम तातडीने मार्गी लावण्यासाठी असलेली धडपड ही त्यांच्या कार्यकाळाची महत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शक्य तितक्या जलदगतीने तोडगा काढण्याची त्यांची भूमिका नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी ठरली.

प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखतानाच माणुसकीचा दृष्टिकोन जपणारे अधिकारी म्हणून देशमुख यांची ओळख निर्माण झाली. त्यामुळेच त्यांच्या बदलीची किंवा पदोन्नतीची बातमी आनंदाची असली, तरी सिन्नरकरांना एक आपला, विश्वासाचा अधिकारी पुढील जबाबदारीसाठी दूर जात असल्याची हुरहूरही जाणवत आहे.

सिन्नरमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची पावतीच त्यांच्या उपजिल्हाधिकारीपदी झालेल्या पदोन्नतीतून मिळाली आहे. नव्या जबाबदारीतही त्यांच्या कार्यक्षमतेचा, प्रामाणिकपणाचा आणि संवेदनशील प्रशासकीय दृष्टिकोनाचा निश्चितच ठसा उमटेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

सिन्नरच्या मातीशी जोडलेला हा कर्तव्यनिष्ठ अधिकारी आता उपजिल्हाधिकारी म्हणून नव्या जबाबदारीकडे वाटचाल करीत आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी सिन्नरकरांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन!

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका