साप्ताहिक ‘निःपक्ष सत्यगुरु’च्या प्रथम अंकाचा भव्य प्रकाशन सोहळा गुरुवारी सिन्नरमध्ये

निःपक्ष सत्यगुरु | सिन्नर, दि. २२ जानेवारी २०२६
सत्य, निर्भीडता, सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या साप्ताहिक ‘निःपक्ष सत्यगुरु’ या वृत्तपत्राच्या प्रथम अंकाचा भव्य प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सिन्नर येथील श्रीलेखा कॉम्प्लेक्स, महालक्ष्मी रोड, लाल चौक येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ संपादक प्रा. जयंत महाजन (दै. महासागर) असणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संजयजी गीते (सहाय्यक निबंधक, सिन्नर) राहणार आहेत. तर सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. अभिजीत कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी साप्ताहिक ‘निःपक्ष सत्यगुरु’चे
मुख्य संपादक – कांताराम माळी,
कार्यकारी संपादक – बाळासाहेब देशपांडे, संपादक – नारायणशेठ वाजे
यांच्यासह संचालक मंडळ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
निःपक्ष, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा संकल्प घेऊन सुरू होत असलेल्या या साप्ताहिकाच्या प्रकाशन सोहळ्यास सर्व संचालक, संपादक, पत्रकार बांधव, वाचक व हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.