श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात संपन्न
श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात संपन्न
नाशिक | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि. २७ मार्च २०२६
श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात चैत्र शुद्ध अष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेला श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्रीराम पूजनाने झाली. विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन पार पडले. त्यानंतर स्वयंसेवी महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित भजन कार्यक्रमाने परिसर भक्तिरसात रंगून गेला.
दुपारी बारा वाजता श्रीराम जन्म सोहळा व महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी आयोजित गीतरामायण कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. गायक विवेक केळकर यांनी सादर केलेल्या सुमधुर गीतांनी वातावरण भारावून गेले.
या कार्यक्रमास विविध मान्यवर, स्थानिक नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पडला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन “सीता वल्लभ बहुउद्देशीय संस्था, श्रीरामनगर” यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिता वल्लभ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजयजी गीते, उपाध्यक्ष सचिन गुलाटी, सचिव प्रवीण सोनार, खजिनदार ज्ञानेश्वर मेतकर तसेच सल्लागार माजी नगरसेवक यशवंत निकुळे, रीमा गुलाटी, पंढरीनाथ मेतकर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच सदस्य अरविंद नागमोती, सुधाकर वारे, संजय करंदीकर, राजेंद्र कदम, राजेंद्र देसले, भावसार, भगवान सोनवणे, मनीष काबरा आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.



