सिन्नरच्या कु. भैरवी कमानकर हिचे उज्ज्वल यश

सिन्नरच्या कु. भैरवी कमानकर हिचे उज्ज्वल यश
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, दि. ९ मे २०२६ www.nipakshsatyaguru.in
येथील चांडक कन्या विद्यालय मधील विद्यार्थिनी कु. भैरवी राजेंद्र कमानकर हिने दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले असून, सिन्नर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. विशेष म्हणजे तिने संस्कृत व गणित या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त करून विद्यालय, पालक व सिन्नर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
कु. भैरवी हिच्या या यशाबद्दल सौ. प्रिया कुलकर्णी, सौ. सुनीता करडीले, श्री. श्रीराम क्षत्रिय, सौ. सुवर्णा सोनवणे, सौ. सविता कमानकर, श्री. गोरक्षनाथ सोनवणे, श्री. राजहंस माळी, श्री. मंगेश जाधव, श्री. संदीप कांडेकर, श्री. कांताराम माळी, श्री. संजय सोनवणे, श्री. कैलास म्हस्के, श्री. नितीन खरनार, डॉ. राजेंद्र कमानकर तसेच डॉ. प्रशांत गाडे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
तिच्या या यशामागे परिश्रम, जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड असून तिला आई-वडील तसेच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 🌹
सिन्नरच्या कु. भैरवी कमानकर हिचे उज्ज्वल यश


