ताजे अपडेट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ 

सिन्नर तालुक्यातील ९३ गावांच्या याद्या प्रसिद्ध

सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि. २५ जुलै २०२६ www.nipakashsatyaguru.in

महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिन्नर तालुक्यातील ९३ गावांतील पात्र शेतकरी सभासदांच्या दोन लाख रुपयां पर्यंतच्या कर्जमाफी संदर्भातील याद्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

    सदर याद्या तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, ग्रामपंचायत कार्यालयांचे नोटीस बोर्ड, तलाठी कार्यालय तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये दर्शनी भागात लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

      या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र सभासदांनी तत्काळ आपले आधार प्रमाणिकरण (Aadhaar Authentication) करून घेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्याशिवाय संबंधित लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

     तसेच ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी उपलब्ध नाही, त्यांनी जवळच्या सीएससी (Common Service Center) केंद्रावर जाऊन त्वरित नोंदणी करून फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

     या संदर्भात सहाय्यक निबंधक श्री. संजय गिते व तालुका विकास अधिकारी श्री. कैलास निरगुडे यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

    शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी ही योजना मोठी मदत ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका