ताजे अपडेट

अफवांवर विश्वास ठेवू नका; नागरिकांनी अधिकृत माहितीच तपासावी – पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांचे आवाहन

अफवांवर विश्वास ठेवू नका; नागरिकांनी अधिकृत माहितीच तपासावी – पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांचे आवाहन

सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी :

सध्या सोशल मीडियावर इराण व अमेरिका यांच्यातील संभाव्य युद्धासंदर्भात तसेच लॉकडाऊनबाबत विविध अफवा वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसून कोरोनाच्या काळातील जुने फोटो, व्हिडिओ किंवा संदेश पुन्हा व्हायरल करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, WhatsApp, Facebook यांसारख्या सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही बातम्या पडताळणी न करता पुढे पाठवू नयेत, असेही त्यांनी आवाहन केले. केवळ भारत सरकार, संरक्षण मंत्रालय किंवा अधिकृत सरकारी न्यूज चॅनेल्स यांच्याकडून प्रसिद्ध होणारी माहितीच विश्वासार्ह मानावी, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अफवा पसरवणे किंवा चुकीचे संदेश फॉरवर्ड करणे हा कायद्याने गुन्हा असून अशा कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका