ताजे अपडेट

“खरात प्रकरणाचा परिणाम: फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांचा राजीनामा”

“खरात प्रकरणाचा परिणाम: फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांचा राजीनामा”

सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, दि. २३ एप्रिल २०२६, www.nipakshsatyaguru.in 

भोंदू बाबा म्हणून ओळख असलेल्या अशोक खरात यांच्याविरोधातील विविध प्रकरणांची चौकशी सध्या वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते व महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचे त्यांच्याशी असलेले संबंध उघडकीस येत आहेत. महिलांचे लैंगिक शोषण, भोंदुगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोपही त्यांच्या विरोधात करण्यात आले आहेत.
या घडामोडींमुळे समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अनेक वर्षे त्यांनी हे पद सांभाळले होते; मात्र अलीकडेच अशोक खरात यांचे समता पतसंस्थेशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर सभासदांमध्ये नाराजी वाढली होती. त्यातूनच त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव निर्माण झाला आणि त्यांनी अखेर पद सोडण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील सुमारे 15 हजार पतसंस्था या फेडरेशनच्या अंतर्गत कार्यरत आहेत. जवळपास 6 हजार सभासद असलेल्या या फेडरेशनचे नेतृत्व काका कोयटे 2015 पूर्वीपासून करत होते. परंतु, अशोक खरात आणि समता परिषदेतील संबंधांची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली.

       दरम्यान, समता पतसंस्थेत अशोक खरात सुमारे 100 खात्यांचे नॉमिनी असल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचेही उघड झाले असून, त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

      याबाबत स्पष्टीकरण देताना काका कोयटे म्हणाले, “माझा अशोक खरात यांच्याशी कोणताही वैयक्तिक संबंध नाही. मी त्यांचा भक्त नाही. फेडरेशनच्या एका कार्यक्रमात ते केवळ एकदाच उपस्थित होते.”

        सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, आगामी काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका