मणक्याच्या तपासणी व मोफत उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मणक्याच्या तपासणी व मोफत उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि १४ ऑगस्ट २०२६, www.nipakshsatyaguru.in
लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी आणि एस. आर. व्ही. हॉस्पिटल्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे आयोजित करण्यात आलेल्या मणक्याची तपासणी व मोफत उपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ९० हून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना मणक्याशी संबंधित विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये डॉ. गौरव गुजराथी, डॉ. रिधा, डॉ. मुस्कान खान यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच श्री. योगेश दिघे (मार्केटिंग मॅनेजर), श्री. निलेश परजणे (असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर) आणि श्री. सागर चासकर यांनी शिबिराच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या नूतन अध्यक्षा स्मिता थोरात, सचिव वैशाली सानप, खजिनदार संगीता वाजे, झेड.सी. डॉ. सुजाता लोहारकर आणि जीएलटी कोऑर्डिनेटर अपर्णा क्षत्रिय यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला.
कार्यक्रमास लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत नाना वाजे, मनीष गुजराथी, संजय सानप, गोपी शिंदे, रमेश कट्यारे, डॉ. प्रतिभा गारे, मधुबाला कटारिया, संगीता कट्यारे यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी व अनेक सभासद उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय लोहारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख डॉ. प्रशांत गाढे यांनी केले.
मणक्याशी संबंधित विविध विकार, पाठदुखी, कंबरदुखी तसेच इतर समस्यांबाबत रुग्णांना तज्ज्ञांकडून तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळाल्याने शिबिराचा नागरिकांना मोठा लाभ झाला. मणक्याच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी व उपचार घेण्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले.



